Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
संजय राऊतांना एके 47 ने उडवून देण्याची बिश्नोई गँगची धमकी; नेमकं प्रकरण काय?
धमकीच्या मेसेजचे स्क्रिनशॉट संजय राऊतांनी सोशल मिडीयावर केले शेअर
मुंबईः उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कांजूर मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राऊत यांच्या निवासस्थानी आणि दैनिक सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला.
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. या मेसेज मध्ये दिल्लीत आल्यास त्यांना AK 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेसेज चा स्क्रिनशॉटही त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून काही जणांना ताब्यात घेतलं आहे.





