MasterChef India : अखेर ‘मास्टरशेफ इंडिया’ चा विजेता ठरला!
सांता सरमाह हिला प्रथम उपविजेते, मुंबईतील सुवर्णा बागुल हिला द्वितीय उपविजेते घोषित

MasterChef India : ‘मास्टरशेफ इंडिया’ या लोकप्रिय कुकिंग शोचा ग्रँड फिनाले काल (३१ मार्च) ला पार पडला. या शोचा विजेता नयनज्योती सैकिया ठरला आहे. या शोच्या फिनालेमध्ये सांता सर्मा, महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल आणि नयनज्योती सैकिया हे टॉप तीन सदस्य होते. यामध्ये नयनज्योतीला बक्षीस म्हणून २५ लाख रुपयांचा चेक, ‘मास्टरशेफ इंडिया’ ची प्रतिष्ठित ट्रॉफी तसेच गोल्डन शेफचा कोट देण्यात आला आहे.
टॉप 36 पासून सुरू झाले, त्यानंतर टॉप 16 पर्यंत, त्यानंतर टॉप 7, टॉप 3 आणि आता मास्टरशेफ इंडियाचे विजेते. आसाममधील नयनज्योती सैकिया यांनी शोमध्ये केवळ त्यांच्या साधेपणानेच नव्हे तर काय विलक्षण वृत्तीनेही मन जिंकले. आसाममधील नयनज्योती सैकिया हिने मास्टरशेफ इंडियाची विजेती ट्रॉफी जिंकली. त्याने पदक आणि २५ लाखांचे रोख बक्षीसही घेतले.
आसाममधील सांता सरमाह हिला प्रथम उपविजेते आणि मुंबईतील सुवर्णा बागुल हिला द्वितीय उपविजेते घोषित करण्यात आले. दोघांना अनुक्रमे ५ लाखांचा धनादेश मिळाला.





