Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Sambhaji Bhide | छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते; संभाजी भिडेंचे विधान चर्चेत

Sambhaji Bhide | हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लामीकरणाच्या विरोधात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर आता श्री. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, असं विधान केलं आहे. तसेच, प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं भिडे गुरूजी म्हणाले.

संभाजी भिडे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. इतिहासाचा अभ्यास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले सगळे भाडोत्री आहेत. त्यांच्याकडून हा गलबला निर्माण झाला आहे.

हेही वाचा  :  रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी 

शहाजी राजे हे स्वतः मला हिंदवी राज्य स्थापन करायचे आहे असं बोलले आहेत. याचे पुस्तकात पुरावे आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. पण सगळ्या समाजातील लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्यासाठी कसा होईल ते बघतात, असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे ,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button