Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी: कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीकडून क्लीनचीट

मुंबई: कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून (NCB) शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण सहा हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडून आर्यनला (Aryan Khan) क्लीनचीट मिळाली आहे.

आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण १४ जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला होता. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button