Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘टिपू सुलतान हे इतिहासातील जटिल व्यक्तिमत्व’; एस. जयशंकर यांचे विधान

S Jaishankar | देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी भाष्य केले आहे. टिपू सुलतान हे भारताच्या इतिहासातील अत्यंत जटिल व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. भारतावरील ब्रिटीश राजवटीला विरोध करणारी महत्तवाची व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. तसेच त्यांचा पराभव आणि मृत्यू भारतीय उपखंडासाठी भविष्यासाठी महत्त्वाचे वळण ठरले, असेही एस. जयशंकर म्हणाले.

एस. जयशंकर म्हणाले, की म्हैसूर भागात टिपू सुलतान यांच्या राजवटीचा नकारात्मक प्रभाव देखील दिसून आला. म्हैसूरच्या अनेक भागात आजही त्यांच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही. भारताच्या इतिहासात त्यांनी इंग्रजांना केलेल्या विरोधावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आणि त्यांच्या प्रशासनाच्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्व समाजात इतिहास गुंतागुंतीचा असतो. आजचे राजकारण अनेकदा निवडक वस्तुस्थितीमध्येच गुंतलेले असते. टिपू सुलतान प्रकरणात देखील असेच झाले आहे.

हेही वाचा     –      ‘मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं पण..’; शिवसेना नेत्याचे सूचक विधान 

मागील १० वर्षात राजकीय परिस्थिती बदलल्याने पर्यायी दृष्टीकोन समोर आले आहेत. आता आपण वोट बँकचे कैदीही नाहीत आणि गैरसोयीचे ठरेल असे सत्य उघड करणे राजकीयदृष्ट्या चुकीचेही ठरत नाही, असं एस. जयशंकर म्हणाले.

वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही शतकांमध्ये अनेक राजवटी आणि संस्थानांनी आपल्या विशेष हितसंबंधांसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सहभाग घेतला आणि काहींनी स्वातंत्र्यानंतरही हे सुरूच ठेवले. टिपू सुलतानच्या मिशनरी आणि फ्रेंच, इंग्रज समकक्ष यांच्यात झालेला संवाद खरोखर आकर्षक आहे, असंही एस. जयशंकर म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button