Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार

पुणे : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय रेल्वे प्रशासन या प्रकल्पासाठी आशावादी आहे.

हरियाणातील जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान ही ट्रेन धावण्याचे निश्चित आहे. लखनौ येथील रीसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) या ट्रेनची रचना केली आहे. डीझेल किंवा ईलेक्टि्रक उर्जेचा वापर न करता ही ट्रेन पूर्णपणे हायड्रोजनच्या शक्तीवर धावणार आहे.

या ट्रेनसाठी 2,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये २१० किलोवॅट बॅटरी, फ्युअल सेल आणि तीन हायड्रोजन सिलिंडर्स असतील. चालकाच्या मागील बाजूस कंट्रोल पॅनेल असेल.

हेही वाचा –  मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं पण..’; शिवसेना नेत्याचे सूचक विधान

या ट्रेनमध्ये 8 प्रवासी डबे असतील. म्हणजेच एकावेळी सुमारे 2638 जण प्रवास करू शकतील. त्याचा वेग ताशी 110 किलोमीटर असेल. प्रवासी डब्याशिवाय हायड्रोजन सिलिंडरसाठी 2 डबे असतील. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे त्याचे एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.

आतापर्यंत हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या ट्रेन फक्त जर्मनी, स्वित्झर्लंड आणि चीनमध्ये बनवल्या गेल्या. परंतु हा प्रयोग फारसा यशस्वी झालेला नाही. सध्या अशी ट्रेन फक्त जर्मनीत धावत असून तिला दोन डबे आहेत. भारतातील ट्रेन काहीशी वेगळी आणि यशस्वी ठरण्याची अपेक्षा आहे.

फायदे

– या ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. ज्यामुळे हरित आणि शाश्वत वाहतुकीला चालना मिळेल.

– भारताच्या रेल्वे व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेमध्ये हे महत्त्वपूर्ण योगदान असेल.

– हायड्रोजनकडे भविष्यातील ऊर्जा म्हणून पाहिले जात आहे.

– ही ट्रेन भारतातील हायड्रोजन-आधारित वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देईल.

“हायड्रोजन इंधनावर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे आहे. इतर देश एक हजार अश्वशक्ती क्षमतेचा वापर करत आहेत. भारतीय तंत्रज्ञ १२०० अश्वशक्ती क्षमतेवर काम करत आहेत. देशातील बोटी, आणि ट्रकमध्येही या इंधनाचा वापर व्हावा, अशी आमची इच्छा आहे.”

 – अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button