Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे. रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रूपाली चाकणकर यांनी केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. दीड हजार रुपयात काय येतं? असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. त्यावरून रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ ही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये, असा घणाघातही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad Update। सोसायटीधारक राजकीय षडयंत्राचे ‘शिकार’; निवडणुकीच्या काळात सतर्कतेची गरज! 

तर रूपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्व देत नसल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना दिले आहे. आता रुपाली चाकणकर या टीकेवर काय पलटवार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी  बोलताना राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका सत्ताधाऱ्यांवर केली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला आहे. त्यांनी विविध भाषणात केलेली वक्तव्य, महिलांच्याबाबत अश्लील वक्तव्य पाहिली तर ते लक्षात येते. खडसे यांच्याकडे बघण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरला असताना ते इतके मोठे नेते कसे झाले हा माझ्या पुढे प्रश्न आहे. खडसे माझ्यासाठी संपले आहेत. खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून खडसे यांची ओळख आहे. त्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button