Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उदयनराजे अन् शिवेंद्रराजे आमनेसामने, भूमिपूजनावरून कार्यकर्त्यांमध्ये राडा

सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचं नव्या जागेत भूमीपूजन होणार होतं. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. सकाळी भूमीपूजन कार्यक्रमापुर्वीच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंपाजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूमीपूजन करण्यात येणार होते. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. पण त्याआधीच खासदार उदयनराजे अचानक कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी त्याठिकाणी असलेलं साहित्य फेकून देण्यात आलं. तसंच कंटेनरही पलटी करण्यात आला.

हेही वाचा – ‘..तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

माझ्या जागेत भूमीपूजन करायचं नाही असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना झापलं. वाद सुरू असतानाच आमदार शिवेंद्रराजेंनी भूमिपूजन केलं. त्यानंतर काही वेळातच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर भूमीपूजन झालेच नाही. नारळ आणि फटाके फोडणे म्हणजे भूमीपूजन नाही. काळेधंदे करणारे लोक आहेत. मी द्वेषापोटी बोलत नाही, असं उदयनराजे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button