Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

बुलढाणा : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तहसील चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना सभापती श्री. शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. समाजकार्य, सुशासन, न्यायप्रियता आणि लोकहितकारी निर्णयांमुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आदर्श विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  ‘विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सभापती राम शिंदे हे एकदिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्म, समाजसेवा, लोककल्याण आणि विकासकामांना प्राधान्य देत आदर्श राज्यकारभाराची परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देणारा ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button