सुप्रसिद्ध आय. आय. बी. शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..
प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी..
पिंपरी : विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर घडविण्यात मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आयआयबी करिअर संस्थेच्या पिंपरी शाखेत रविवारी (ता.१२) प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि प्रेरक वक्ते प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. “इन्स्पायर” या संस्थेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत लालटोपीनगर मैदान, सम्राट चौक येथे सायंकाळी पाच वाजता त्यांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना चालून आली आहे.
आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ही संस्था गेल्या २५ वर्षापासून वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे प्रशिक्षण राज्यभर देत आहे. त्याव्दारे त्यांनी शेकडो डॉक्टर्स, इंजिनिअर्स घडविले आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्स बनविणारी फॅक्टरी म्हणूनच ही संस्था ओळखली जाते. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही संस्था इन्स्पायर कऱणाऱ्या या व्य़ाख्यानाला आवर्जून आमंत्रित करते. ते विद्यार्थ्य़ांच्या आयुष्याला कलाटणी देणारे व्यासपीठ असल्याने त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयआयबीचे संस्थापक संचालक दशरथ पाटील यांनी केले आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, सुनील शेळके,आण्णा बनसोडे, अमित गोरखे,उमा खापरे, मनपा आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग संचालक ॲड. महेश लोहारे यांनी दिली.
ॲड. लोहारे म्हणाले, नीट(NEET), आयआयटी (IIT), जेईई (JEE), सीईटी (CET) ची सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था (कोचिंग इन्स्टिट्यूट) म्हणून आमच्या संस्थेची ओळख आहे. पिंपरी, पुणे, नांदेड, लातूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथे आमच्या शाखा आहेत. काही गरीब मुलांना आम्ही मोफत प्रवेश देऊन शिकवितो. राज्यातील सर्वात मोठी स्कॉलरशिप परिक्षा घेतो. संस्थेत कोचिंग घेतलेल्या ४१ विद्यार्थ्यांना २०२२ मध्ये देशातील अग्रगण्य अशा एआयआयएमएसमध्ये प्रवेश मिळालेला असून नीटच्या इतिहासात पहिल्यांदा संस्थेच्या ३३ विद्यार्थ्य़ांनी २०२१ मध्ये जीवशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळविलेले आहेत.