पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून मॉरीशस दौर्यावर
भारत आणि मॉरीशस या दोन देशात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक संबंध

मॉरीशस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून मॉरीशस दौर्यावर आहेत. भारत आणि मॉरीशस या दोन देशात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक संबंध आहेत. मॉरीशसला मिनी इंडिया असे पण म्हटले जाते. मॉरीशस आणि भारताचे खास आणि जुने संबंध आहेत. पंतप्रधानांनी 1998 मध्ये पहिल्यांदा मॉरीशसचा दौरा केला होता. या खास दौऱ्याची छायाचित्र समाज माध्यमांवर पुन्हा प्रकटली आहे. मोदी आर्काईव्हच्या माध्यमातून एक पोस्ट पण समोर आली आहे. एक शतकापूर्वी आपले पूर्वज, मजूर म्हणून मॉरीशसमध्ये आले होते. ते आपल्यासोबत तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा आणि हिंदी भाषा घेऊन गेले होते, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यात अजून एक 27 वर्ष जुना अध्याय जोडला गेला आहे. 1998 मध्ये पीएम नरेंद्र मोदी पहिल्यांदा मॉरीशसमध्ये गेले होते.
काय आहेत आठवणी
पंतप्रधान मोदी हे मॉरीशस दौऱ्यावर पहिल्यांदा गेले, त्यावेळी ते कोणत्याही सार्वजनिक पदावर नव्हते. ते तेव्हा भाजपासाठी कार्यरत होते. 2 ते 8 ऑक्टोबर 1998 दरम्यान मोदी हे जागतिक रामायण संमेलनासाठी मॉरीशस येथे गेले होते. त्यावेळी ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी तिथे प्रभू श्रीरामांचा आदर्श, मूल्य आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकला होता. रामायण, भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांना एका सांस्कृतिक धाग्यात बांधते, याचे त्यांना सदोहरण स्पष्ट केले होते.
हेही वाचा – ‘राज्यावर कर्जाचा डोंगर, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले’; नाना पटोले
मॉरिशस
पहिल्याच दौऱ्यात लोकांची जिंकली मनं
1998 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या लोकांची मनं जिंकली. त्यांनी स्थानिक नेते, लोकं यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या इच्छा, आकांक्षा समजून घेतल्या. त्यांनी त्यावेळी मित्र जमवले. तेव्हाचे राष्ट्रपती कासम उतीम, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि विरोधी पक्षनेते अनिरुद्ध जगन्नाथ यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांशी त्यांची पक्की मैत्री झाली. नंतरचे पंतप्रधान पॉल रेमेंड बेरेन्झर यांच्याशी सुद्धा त्यांची भेट झाली होती.
महात्मा गांधीचा मोठा प्रभाव
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातून प्रेरणा घेत मॉरिशस स्वतंत्र झाले. या दौऱ्या दरम्यान मोदी यांनी सर शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यानात राष्ट्रपिता सर शिवसागर रामगुलाम यांना आदरांजली वाहिली. 12 मार्च 2015 रोजी मॉरिशस येथील जागतिक हिंदी सचिवालय भवनाच्या उद्धघटनावेळी मोदी यांनी विचार मांडले. त्यांनी महात्मा गांधी आणि मॉरिशस यांच्या दृढ संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी महात्मा गांधी यांचा प्रभाव देशाबाहेर सुद्धा असल्याचे म्हटले.
त्यांनी मॉरिशस येथील हिंदुस्थानी या दैनिकाचे हे संबंध मजबूत ठेवण्याविषयी कौतुक केले. या दैनिकांनी मॉरिशसला एकता आणि भाषांमधील सौदार्ह जपण्यासाठी मदत केल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या त्रिसूत्रीवर हे दैनिक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. त्यामुळे मॉरिशसमध्ये सर्व भाषीय समूह, गट यांच्यामध्ये एकजिनसीपण आल्याचे मोदी म्हणाले.
आपल्या पहिल्या दौर्यात 17 वर्षांपूर्वी मोदी यांनी 12 मार्च 2015 रोजी गंगा तलाव येथे गंगा मातेला अर्घ्य अर्पण केले. 2015 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त त्यांनी या राष्ट्राला संबोधित केले. आंब्याचे उत्पादन चांगले झाले की नाही पाहण्यासाठी अडीतील सर्वच आंबे तपासण्याची गरज नाही. त्यातील दोन-चार आंबे चाखून पाहिले तरी कळते, तसेच मॉरिशस पाहिल्यानंतर भारताची झलक दिसते असे ते म्हणाले. मॉरिशसवरूनच भारताचा परिचय, ओळख दिसून येते, अशी स्तूतीसुमनं त्यांनी उधळली.