शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात करण्यात आलेल्या भेदभावामुळे येत्या काळात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता

महाराष्ट्र : राज्याचा अर्थसंकल्प काल जाहीर झाला आहे. यात निधी वाटपात करण्यात आलेल्या भेदभावामुळे येत्या काळात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे. तर अजित पवार गटाच्या विभागांना त्यापेक्षा कमी निधी आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांना सर्वात कमी निधी मिळाला आहे.
हेही वाचा – ‘राज्यावर कर्जाचा डोंगर, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले’; नाना पटोले
निधीवाटपात नसलेल्या या समतोलामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात निधी वाटपावरून आधीच महायुतीत धुसफूस सुरू होती. त्यात आता निधी वाटपात झालेल्या या असमतोलाने वाद होण्याची शक्यता आहे. भाजपला 89 हजार 128 कोटी निधी देण्यात आला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 56 हजार 563 कोटींचा निधी दिला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 41 हजार 606 कोटींचा निधी मिळाला आहे.