Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आमदार गणपत गायकवाडांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

हेही वाचा    –    PM किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये

पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता. पण आता गणपत गायकवाड यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button