ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

गायत्री इंग्लिश मेडियम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पुणे | गायत्री इंग्लिश मेडियम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली. योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक उत्साहाने सादर करण्यात आले.

शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे महत्त्व पटवून देत योग हा केवळ एका दिवसाचा उपक्रम नसून निरोगी जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचे आवाहन करण्यात आले.

गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे आदरणीय अध्यक्ष मा. श्री. विनायक भोंगाळे सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शुभेच्छा देत निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा

एमआयटी एसीएससीमध्ये ‘AI-Powered Academic Excellence’ दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी

यावेळी नगरसेविका मा. सौ. कविताताई भोंगाळे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत योगाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी तसेच योगाच्या माध्यमातून शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक विचार विकसित करावेत, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती अंजली भागवत तसेच विपणन प्रमुख मा. श्री. शैलेंद्र सिंग यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले.तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी योगाचार्य श्री. सोमदत्त मुदगल यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना योगाचे शास्त्रीय महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगासने सादर करून योगाबद्दलची जागरूकता आणि उत्साह दर्शविला. संपूर्ण शाळा परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button