ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिंपरी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगतज्ज्ञांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत व एकाग्र होते तसेच तणाव कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. सहभागींस विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले.

योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा पाया आहे, असेही तज्ज्ञांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा संकल्प केला. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.

हेही वाचा

गायत्री इंग्लिश मेडियम स्कूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या प्राचार्या तसेच व्यवस्थापनाने सर्व सहभागी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करून निरोगी जीवनासाठी योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. “योगः कर्मसु कौशलम्” या संदेशासह सर्वांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा संकल्प केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button