भारताचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर! विराट आणि बुमराहचे पुनरागमन

India Squad for England ODI Series | अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता युरोप दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आधी आयर्लंडचा आणि त्यानंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे.
विराट कोहली पायाच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकला होता, तर जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. आता हे दोन्ही दिग्गज खेळाडू संघात परतले आहेत. मात्र, विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश त्याच्या अंतिम फिटनेस चाचणीनंतरच केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यशस्वी जैस्वाल आणि प्रिन्स यादव यांना या संघातून डच्चू देण्यात आला आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंचं मन मोठं, पण…; बंडखोर खासदारांना आदित्य ठाकरेंची साद
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला बहुतांश संघ कायम ठेवण्यात आला असून, शुबमन गिलकडेच संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल.
🚨 News 🚨
India’s ODI squad for the England tour announced.
𝗡𝗢𝗧𝗘: Varun Chakaravarthy has been ruled out of the Ireland T20I Series as he continues his rehab at the BCCI COE.
More Details ▶️ https://t.co/wOdXTQqJto #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/t0GypgM4kp
— BCCI (@BCCI) June 21, 2026
भारताचा इंग्लंडविरुद्धचा वनडे संघ खालीलप्रमाणे आहे:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक:
- १४ जुलै २०२६ – पहिला वनडे सामना – ३.३० वाजता
- १६ जुलै २०२६ – दुसरा वनडे सामना – ५.३० वाजता
- १९ जुलै २०२६ – तिसरा वनडे सामना – ३.३० वाजता





