Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Pawana Water Supply Scheme । पवना बंद पाईपलाईनसाठी राहुल कलाटे ‘‘मैदानात’’

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट : प्रकल्पासाठी निधी व गती देण्यासाठी मागणी

पिंपरी-चिंचवड । पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती देण्यासाठी भाजपाचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनात पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या पवना थेट बंद पाईपलाईन योजनेबाबत महत्त्वाची माहिती मांडण्यात आली. प्रकल्पासाठी सुमारे ९०% भूसंपादन पूर्ण झाले असून महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, एकूण खर्चाच्या किमान २५% निधीची तरतूद नसल्यास टेंडर प्रक्रिया रखडण्याची शक्यता असून प्रकल्प पुन्हा विलंबित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या पवना धरणातून शहराला दररोज सुमारे ५०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येते आणि नंतर प्रक्रिया करून नागरिकांना पुरवले जाते. मात्र या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून प्रदूषणामुळे पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. प्रस्तावित बंद पाईपलाईन प्रकल्पामुळे सुमारे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

विशेष म्हणजे, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित राहिल्याने त्याचा खर्च ३०० कोटींवरून तब्बल १२५६ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तातडीने निधी उपलब्ध करून देऊन प्रशासकीय स्तरावर गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला असून ‘टँकर लॉबी’विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि नियमित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महत्त्वाच्या प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा राहुल कलाटे यांनी व्यक्त केली आहे.

“पिंपरी-चिंचवडकरांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. पवना बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला नक्कीच गती मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
– राहुल कलाटे, नगरसेवक, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button