Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका ऋषभ पंतवर संतापले? मैदानातील व्हिडिओ व्हायरल

LSG vs DC | आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला दिल्ली कॅपिटल्स कडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर संघाच्या गटात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिल्लीकडून समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रभावी भागीदारी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. हंगामातील पहिल्याच सामन्यात झालेल्या या पराभवामुळे लखनौच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.

सामना संपल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोएंका हे थेट मैदानावर उतरले आणि कर्णधार ऋषभ पंत तसेच मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासोबत गंभीर चर्चा करताना दिसले. या चर्चेदरम्यान गोएंका काही मुद्दे समजावून सांगताना दिसत होते, तर पंतही आपली बाजू मांडताना दिसला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा       :            पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची झोपडपट्टी सेवाकर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी! 

केएल राहुल प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी

या घटनेनंतर चाहत्यांना २०२३ मधील एक प्रसंग आठवला, जेव्हा लखनौचा कर्णधार असलेल्या केएल राहुल यांना पराभवानंतर संजीव गोएंका यांनी मैदानातच सर्वांसमोर सुनावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार घडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून अनेक चाहत्यांनी गोएंका यांच्यावर टीका केली आहे.

पुढील सामन्यांमध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान

हंगामाच्या सुरुवातीलाच झालेला हा पराभव लखनौ संघासाठी इशारा मानला जात आहे. आगामी सामन्यांमध्ये संघाची कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान कर्णधार ऋषभ पंत आणि कोचिंग स्टाफसमोर असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button