ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मुसळधार पावसातही लोकसेवेचे जागते पहारेकरी बनले नगरसेविका अर्चना करांडे दांपत्य..!

अतिवृष्टीच्या परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र सज्ज; नागरिकांना दिलासा

पिंपरी-चिंचवड : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. संततधार सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक १३ मधील विविध भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्ते व नाले तुडुंब भरून वाहू लागले. काही ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

या कठीण प्रसंगी नागरिकांना वाऱ्यावर न सोडता, रात्री सुमारे २ वाजल्यापासून नगरसेविका अर्चना अक्षय करांडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांनी आपल्या संपूर्ण टीमसह प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून मदतकार्याला सुरुवात केली. रात्रभर सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता त्यांनी बाधित भागांचा दौरा करत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला.

ज्या ज्या परिसरात पाणी साचले होते किंवा नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जेसीबी (JCB) मशिनरीच्या मदतीने तातडीने मार्ग काढून साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले. या जलद कारवाईमुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

यमुनानगर समर्थ मित्र मंडळ तसेच साईनाथ नगर, निगडी गावठाण परिसरात रस्त्यावर झाडे कोसळून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून झाडांचा अडथळा दूर करण्यात आला. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या संकटात लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता नागरिकांसाठी दिलासादायक ठरली असून, प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवाशांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

शॉर्ट्सर्किटच्या घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

यमुना नगर येथील चैत्रवेल सोसायटी परिसरात एका घरात शॉर्टसर्किट होऊन घरातून धूर निघत असल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक विभागाला कळवले. वेळेत केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. सेक्टर क्रमांक २२ मधील एका इमारतीत पाणी शिरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब दिलासादायक ठरली.

नागरिकांसाठी निवारा व भोजनाची सोय

प्रभाग क्रमांक 13 मधील ज्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, अशा कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तसेच इस्कॉन संस्थेच्या सहकार्याने भोजनाची व्यवस्था नगरसेविका अर्चना करांडे व सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांच्या वतीने करण्यात आली. “आमचे मार्गदर्शक आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्तीच्या काळात महानगरपालिका प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे,” अशी प्रतिक्रिया नगरसेविका अर्चना करांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button