Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तृतीय पंथीयासोबत विधीवत जाहीर विवाह

नांदेड –  सरदारनगर, किनवट येथील आशा उर्फ हसीना शेख महेबूब (वय 30) या तृतीयपंथीयाचा हिमायतनगर येथील राजू संभाजी हनवते (वय 31) याचा सोबत रविवारी (ता.2) दुपारी पावने दोन वाजता बोधडी (बुद्रूक) ता. किनवट येथे विधीवत विवाह संपन्न झाला.

तृतीयपंथीयासोबत झालेला हा विवाह तालुक्यातीलच नव्हे तर बहुधा नांदेड जिल्ह्यातील पहिलाच असावा. राजूने मानलेले आई-वडील, दक्षता समितीच्या सदस्या निर्मला सिनगारे व माजी उपसरपंच मारोती सिनगारे यांना या लग्नाची इच्छा दर्शविली. तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्र, पुष्पहार, विवाह मंच, सर्वांसाठी जेवण आदी लग्नासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. अमोल पाटील यांनी लग्न विधी घेतला.

या विवाह सोहळ्यासाठी हसीनाचा सख्खा भाऊ शेख रहीम, तिची सखी साक्षी सरोद, शहाना शेख, सोनू शेख असीफ यांचेसह बोधडी (बुद्रूक) चे शिवसेनाप्रमुख मारोती दिवसे पाटील, नामदेव अनकाडे, गंगाधर तोटरे, पांडूरंग अलकटवार, सदाशीव ढगे, संदीप सावंत, संजय गिरी, शोभा पाटील, कलूबाई हनवते आदीजणांसह असंख्य वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button