Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर नितीश कुमार यांनी मागितली माफी; म्हणाले..

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर विरोधकांनी या वक्तव्यावरून आक्षेप घेत सडकून टीका केली. दरम्यान, नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे.

नितीश कुमार म्हणाले, माझ्या वक्तव्यावर प्रचंड टीका होत आहे. मी जर काही चुकीचं बोललो असेल, तर मी माफी मागतो. मी माझं वक्तव्य मागे घेतो. माझ्यावर टीका करणाऱ्यांचं मी स्वागत करतो.

हेही वाचा – ‘विराट कोहलीने १०० धावा करणं भारताला त्रासदायक’; गौतम गंभीरचा विचित्र दावा 

नितीश कुमार नेमकं काय म्हणाले होते?

मुलगी शिकली, तिने लग्न केलं की, पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो, असं नितीश कुमार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button