breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘विराट कोहलीने १०० धावा करणं भारताला त्रासदायक’; गौतम गंभीरचा विचित्र दावा

Gautam Gambhir : विराट कोहलीने रविवारी झालेल्या सामन्यात ऐतिहासिक ४९ वी शतकी खेळी केली. विराटने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. मात्र, यावरून पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद हाफीजने ‘स्वार्थी’ म्हटलं होतं. दरम्यान, यावरून भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने सुद्धा विराट कोहलीच्या शतकी खेळीवर मोठं विधान केलं आहे.

गौतम गंभीर म्हणाला, कोहलीने त्याच्या डावाच्या शेवटी वेग बराच कमी केला होता. जर ती चांगली खेळपट्टी असती तर नंतर दक्षिण आफ्रिकेने सुद्धा फायदा घेत भारताला त्रास दिला असता. कोहलीने तीन आकड्यांची धावसंख्या पूर्ण करण्यासाठी वेग कमी केला असावा पण हे भारतासाठी कठीण ठरू शकलं असतं. उलट ७७ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला श्रेय द्यायला हवा ज्याने १८९ धावांच्या भागीदारीत कोहलीमुळे आलेलं दडपण दूर केलं.

हेही वाचा – ‘मराठ्यांचं आरक्षण कुणामुळे रोखलं गेलं त्याची यादी जाहीर करु’; जरांगे पाटलांचा इशारा

कोहलीसाठी टिकवून ठेवणारी डीप फलंदाजी करणे महत्त्वाचे होते पण मला वाटते की शेवटच्या ५-६ षटकांमध्ये त्याचा वेग अगदीच कमी झाला, कदाचित तो शतकाच्या जवळ होता, म्हणून असावा. पण मला वाटतं, आधीच पुरेशा धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरने तेव्हा चान्स घेतला आणि विराट कोहलीवरील दबाव कमी केला, त्याचे श्रेय त्याला द्यायला हवे. दोघांनीही मधल्या फळीत खेळताना चांगली फलंदाजी केली, केशव महाराज उत्तम फॉर्ममध्ये असताना त्यांनी परिस्थिती चांगली हाताळली, असंही गौतम गंभीर म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button