Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मिशन विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर!

विद्यमान आमदारांना उमेदवारी : वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील एकही उमेदवारी जाहीर केली नाही.

यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.

वाचा उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे
1. इस्लामपूर – जयंत पाटील
2. काटोल – अनिल देशमुख
3. घनसावंगी – राजेश टोपे
4. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
5. मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
7. बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
8. जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
9. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
10. राहुरी – प्राजक्त तनपुरे
11. शिरुर – अशोक पवार
12. शिराळा – मासिंगराव नाईक
13. विक्रमगड – सुनील भुसारा
14. कर्जत – जामखेड – रोहित पवार
15. अहमदपूर – विनायकराव पाटील
16. सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
17. उदगीर – सुधाकर भालेराव
18. भोकरदन – चंद्रकांत दानवे
19. तुमसर – चरण वाघमारे
20. किनवट – प्रदीप नाईक
21. जिंतूर – विजय भामरे
22. केज – पृथ्वीराज साठे
23. बेलापूर – संदीप नाईक
24. वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
25. जामनेर – दिलीप खोडपे
26. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
27. मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
28. नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
29. किरोडा – रविकांत गोपचे
30. अहिरी – भाग्यश्री आत्राम
31. बदनापूर – बबलू चौधरी
32. मुरबाड – सुभाष पवार
33. घाटकोपर पूर्व – राखी जाधव
34. आंबेगाव – देवदत्त निकम
35. बारामती – युगेंद्र पवार
36. कोपरगाव – संदीप वरपे
37. शेवगाव – प्रताप ढाकणे
38. पारनेर – राणी लंके
39. आष्टी – मेहबूब शेख
40. करमाळा – नारायण पाटील
41. सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
42. चिपळूण – प्रशांत यादव
43. कागल – समरजीत घाटगे
44. तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
45. हडपसर – प्रशांत जगताप

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button