Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- PCMC: तळवडेतील नावे चिखलीत; माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर आक्रमक!

निवडणूक विभागाकडे हरकती नोंदवण्याचे मतदारांना आवाहन :  महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये सुधारणीची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । तळवडे येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधील तळवडे गावठाण येथील मतदारांची नावे चिखली प्रभागात समाविष्ट झाल्याची शंका उपस्थित केली आहे. संबंधित मतदारांनी आपला मतदानाचा हक्क त्यांच्या वास्तव्य ठिकाणाच्या प्रभागात मिळावा आणि यासाठी तातडीने हरकती घ्याव्यात. प्रशासनाने मतदार यादी दुरूस्ती करावी, अशी आक्रमक भूमिका भालेकर यांनी घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली असून, यादीतील त्रुटी सुधारण्यासाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी दि. 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदार यादींवर अभ्यास सुरू केला असून, दुरूस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तळवडे गावठाण येथील यादी क्रमांक 7 चा समावेश चिखली प्रभाग- 1 मध्ये केला गेला आहे. त्यामुळे भालेकर यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, सदर नावे नजरचुकीने गेली आहेत की, राजकीय फायदा उठवण्यासाठी असा खोडसाळपणा केला का? अशा संशयही भालेकर यांनी व्यक्त केला आहे.

शांताराम बापू भालेकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 12 मधील अनेक मतदारांची नावे लगतच्या प्रभागात गेली आहेत. त्यामुळे मतदारांनी आपल्या प्रभागातील मतदार यादीतच आपले नाव असल्याबाबत खात्री करावी. नसेल,तर नाव समाविष्ट करण्याबाबत अर्ज करावा, जेणेकरून अंतिम यादीत योग्य सुधारणा करता येतील. हरकतीसाठी अर्ज करताना आधार कार्ड किंवा ओळखपत्र आणि पत्त्याचे पुरावे जोडणे अत्यावश्यक आहे. BLO आणि महापालिका प्रशासन अर्जाची पडताळणी करून योग्य सुधारणा करतील, ज्यामुळे मतदारांचा मतदानाचा हक्क त्यांच्या वास्तव प्रभागात सुनिश्चित होईल. यासाठी मतदारांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात भेट द्यावी आणि हरकतीचा अर्ज मिळवावा. तसेच, अधिक माहितीसाठी श्री भालेकर : 8888971010 यांच्याशी संपर्क साधावा.

“महानगरपालिकेच्या मतदार यादीत तळवडे गावठाणमधील यादी क्रमांक- 7 लगतचा प्रभाग चिखलीमध्ये समाविष्ट केली आहे. ती यादी दुरूस्त करुन प्रभाग-12 तळवडे गावठाणमध्ये जोडावी. प्रत्येक मतदाराला त्यांच्या वास्तव्य करीत असलेल्या प्रभागात मतदानाचा हक्क मिळावा यासाठी प्रशासनाने त्वरित दुरूस्ती करावी. तळवडे प्रभागातील सूज्ञ मतदारांनी आपले नाव प्रारुप मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबत खात्री करावी. माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा. मतदार यादीत नाव नसेल, तर हरकतींचा अर्ज भरावा आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन करतो.’’
– शांताराम बापू भालेकर, माजी नगरसेवक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button