Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुपीनगर-तळवडे प्रभागात मोफत आरोग्य शिबिर; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विधायक उपक्रम: आरोग्यदूतांच्या सहकार्याने महिलांसाठी स्त्रीरोग व कर्करोग तपासणी

पिंपरी-चिंचवड | भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपीनगर-तळवडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये नुकतेच लोकमान्य हॉस्पिटल्सच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विशेषतः महिलांना स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसह विविध आरोग्य सेवा मोफत पुरवण्यात आल्या.

गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 5.30 या वेळेत प्रबोधनकार ठाकरे प्रशाला येथे पार पडलेल्या शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण 257 महिलांनी सहभाग नोंदवला आणि विविध आजारांची तपासणी करून घेतली.

शिबिरात रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG), ऑर्थोपेडिक तपासणी यांसारख्या सामान्य तपासण्यांसह स्तन कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, लिगामेंट टीयर तपासणी, ऑर्थोस्कोपी (डायग्नोस्टिक), ACL रिपेअर, मेनिसेक्टॉमी, कर्करोग शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन, तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यांसारख्या प्रगत आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

हेही वाचा      :        बापरे….नगरसेवकपदाचा एक कोटीमध्ये लिलाव?

गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, लिगामेंट टीयर, फ्रॅक्चर्स, मणक्याच्या शस्त्रक्रिया आणि सांधे प्रत्यारोपण यांसारख्या अस्थिरोग व मणका संबंधित समस्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, शितलताई वर्णेकर, संगीता ताई भालेकर, संगीता ताई गोडसे, वैशालीताई भालेकर, गजानन भाऊ वाघमोडे, नंदू तात्या भालेकर, संदीपभाऊ जाधव, श्यामकांत दादा सातपुते, रविराज शेतसंधी, संतोषभाऊ निकाळजे यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

शिबिराचे आयोजन मा. नगरसेवक श्री. शांताराम कोंडीबा भालेकर उर्फ एस.के.बापू आणि आरोग्यदूत मनेश पंडित भालेकर यांच्या सहकार्यातून केले गेले. प्रभागातील महिलांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळाल्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हेच आमचे प्रमुख प्राधान्य आहे. विशेषतः महिलांचे आरोग्य अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यासाठी नियमित तपासण्या आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या आरोग्य शिबिरातून स्त्रीरोग, कर्करोग आणि सामान्य आजारांवर महिलांना मोफत तपासणी उपलब्ध करून देऊन आम्हाला त्यांचे स्वास्थ्य सुनिश्चित करण्याची संधी मिळाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन मिळावे हाच आमचा हेतू आहे, आणि यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत.

– शांताराम बापू भालेकर, माजी नगरसेवक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button