ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगे यांनी मुस्लीम विद्वान नोमानी यांची घेतली भेट

साहेब मोठे विचारवंत त्यांच्याशी चर्चा प्रचंड मार्गदर्शन,त्यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकते

संभाजीनगर : मराठा आरक्षणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेत हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जमीन कसली आहे. त्यांनी बैठकांचा आणि भेटीचा धडाका लावला आहे. अंतरवाली सराटी राज्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्र होऊ पाहत आहे. मराठा आरक्षणाचं आणि ओबीसी आंदोलनाचं भांडवल करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जरांगे पाटील यांची कायदा तज्ज्ञांशी चर्चा झाली तर दुसरीकडे जातीय ध्रुवीकरणाला शह देण्यासाठी त्यांनी धार्मिक एकोप्यावर भर दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगरात मोठी घडामोड घडली.

मुस्लीम विद्वान नोमानी यांची घेतली भेट
मनोज जरांगे पाटील आणि खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली. सज्जाद नोमानी भारतीय इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याचवेळी ते मुस्लीम आरक्षणाचा पण मुद्दा ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा ठाकले तर राज्यातील चित्र बदलू शकते.

आता पडघम कशाचे आहेत हे सर्वांना माहित आहे गोरगरीबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे सामान्य जनता अडचणीत सापडले आहे तेव्हा आपण चर्चा केली पाहिजे जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे.

नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जेष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक वाटलं म्हणून मी त्यांचा मार्गदर्शन घेतलं, असं जरांगे पाटील म्हणाले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो तिथे जात लावून चालत नाही खेचून आणायचा आहे त्यामुळे मानवतावाद जागा ठेवणे महत्त्वाचा आहे नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं प्रचंड मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकतं, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

ते प्रचंड आजारी आहेत त्यांना आंतरवाली मध्ये येता येत नव्हतं त्यांची धडपड होती मात्र त्यांना येता आलं नाही त्यामुळे मी इथपर्यंत आलो एक-दोन दिवस चर्चा होऊन पुढचा निर्णय होईल माणुसकीच्या नात्याने आम्ही भेट घेतली आहे त्यांना अन्यायाची चीड आहे समाजाचा आणि गोर गरीबांचा मान सन्मान वाढवणं गरजेचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button