ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘‘शक्तीस्थळ’’चे लोकार्पण १ जानेवारीला! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित : आमदार शंकर जगताप यांची माहिती 

पिंपरी-चिंचवड/पुणे: लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृती आणि कार्याला समर्पित असलेल्या शक्तीस्थळाचे भव्य लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.

हे शक्तीस्थळ म्हणजे आदरणीय लक्ष्मणभाऊंच्या जनसेवेच्या कार्याचा वारसा आणि भावी पिढीसाठीची प्रेरणा यांचा संगम आहे. समाजहितासाठी केलेल्या त्यांच्या निष्ठावान कार्याची, प्रेमाची आणि लोककल्याणाच्या ध्यासाची आठवण सदैव जागी ठेवणारे हे शक्तीस्थळ नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

हा लोकार्पण सोहळा मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे येथे पार पडणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहावेत, असे भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी आवाहन केले आहे. लक्ष्मणभाऊंच्या कार्याची प्रेरणा आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button