ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील गवळीनगरमध्ये भाजपच्या चारही उमेदवारांची भव्य पदयात्रा

मिशन-PCMC: विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांकडून मागितला आशीर्वाद

पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ५ मधील गवळीनगर व परिसरात भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्साहपूर्ण पदयात्रा काढण्यात आली. विकासाच्या मुद्द्यावर केंद्रस्थानी ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

‘अटल भाजपा, अटल भारत’ हा संकल्प उराशी बाळगून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत उमेदवार श्री. जालिंदर बापू शिंदे, श्री. सागर भैय्या गवळी, सौ. अनुराधाताई गोफणे आणि सौ. कविता भोंगाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. फुगे प्राईमा येथून सुरू झालेली ही पदयात्रा दिघी रोड कॉर्नर, हरी ओम स्वीट, विदर्भ मित्र मंडळ, श्रमजीवी शाळा, पाणी टाकी, प्रज्वलित मंडळ ट्रस्ट, गवळीनगर जय महाराष्ट्र मित्र मंडळ, स्वयंभू गणपती, आळंदी रोड, शास्त्री चौक, श्रीराम मंदिर, पोस्ट ऑफिस आणि संत तुकाराम कार्यालय अशा प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत संपन्न झाली.

हेही वाचा     :          मुंबई पालिका निवडणूक: ठाकरेंच्या युतीची पहिली उमेदवार यादी जाहीर, २८ नावांचा समावेश ! 

पदयात्रेदरम्यान भाजपच्या माध्यमातून शहरात व प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेला प्रभागाचा कायापालट, तसेच आगामी काळात प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत दिली. मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी फुलांची उधळण करत व जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांसह रस्ते, पाणीपुरवठा व पायाभूत सुविधांच्या कामांमुळे परिसरात विकासाचा वेग वाढल्याचे चित्र दिसून येत असून, यामुळे नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून भाजपने प्रभाग क्रमांक ५ मध्ये आपली संघटनात्मक ताकद दाखवत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

उमेदवार कविता भोंगाळे- कडू पाटील म्हणाल्या, “केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच महापालिकेतही भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व असेल, तर विकासकामांना अधिक गती मिळेल. हा विश्वास केवळ आमच्यातच नाही, तर नागरिकांमध्येही आहे. या पदयात्रेतून तो स्पष्टपणे दिसून आला.”विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करत भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांकडून आशीर्वाद मागितले.

केंद्र, राज्य आणि महापालिका या तिन्ही स्तरांवर भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व असल्यामुळे भोसरीच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळणार आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.

– कविता भोंगाळे-पाटील, उमेदवार, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button