मुंबई पालिका निवडणूक: ठाकरेंच्या युतीची पहिली उमेदवार यादी जाहीर, २८ नावांचा समावेश

मुंबई | महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण २८ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या जवळपास २० वर्षांत न घडलेली राजकीय घटना यंदा मुंबईत पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली असून, याबाबत नुकतीच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन औपचारिक घोषणा करण्यात आली. या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असून सर्वांचे लक्ष उमेदवार घोषणांकडे लागले होते.
हेही वाचा : दिल्लीच्या धर्तीवर हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’? वाढत्या प्रदूषणामुळे आयटीयन्सची मागणी
जाहीर करण्यात आलेली पहिली यादी ही उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची असून, या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही दिवस शिल्लक असल्याने, येत्या दोन दिवसांत सर्वच पक्षांच्या अंतिम जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी
क्रमांक वॉर्ड उमेदवार
१ ५४ अंकिता प्रभू
२ ५९ शैलेश फणसे
३ ६० मेघना काकडे-माने
४ ६१ सेजल सावंत
५ ६२ झीशान मुलतानी
६ ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
७ ६४ सबा खान
८ ४० सुहास वाडकर
९ २०६ सचिन पडवळ
१० ९३ रोहिणी गांबळे
११ १०० साधना वरस्कर
१२ १५६ संजना कासले
१३ १६४ साईनाथ कटके
१४ १६८ सुधीर खातू
१५ १२४ सकीना शेख
१६ १२७ स्वरूपा पाटील
१७ ८९ गितेश राऊत
१८ १४१ विठ्ठल लोकरे
१९ १४२ सुनंदा लोकरे
२० १३७ महादेव आंबेकर
२१ १३८ अर्जुन शिंदे
२२ १६७ सुवर्णा मोरे
२३ १५० सुप्रदा फातर्फेकर
२४ ९५ चंद्रशेखर वायंगणकर
२५ २१५ किरण बालसराफ
२६ २१८ गीता अहिरेकर
२७ २२२ संपत ठाकूर
२८ २२५ अजिंक्य धात्रक




