Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“मी चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी”; बारामतीत सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar Speech : बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांशी बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला होता.

बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही कांकणभर मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

हेही वाचा –  IPL 2026 KKR vs PBKS: ईडन गार्डन्सवर पावसाचे सावट; कोलकाता नाईट रायडर्सला खातं उघडण्यासाठी अजून वाट बघावी लागणार?

बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागिरी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहणार आहे, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, चेतन तुपे, सना मलिक, सरोज अहिरे, अनिकेत तटकरे, अंकिता पाटील, अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, उमेश पाटीलसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button