लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत मी भागीदार नाही; अहवाल आल्यावर निर्णय; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले स्पष्ट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत होणा-या आरोपांमुळे राज्याचे उद्योगमंत्रालय चांगलेच अडचणीत आले आहे. मात्र ‘मिटेनी’ या कंपनीची यंत्रणा लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत दाखल झाल्याने आता राज्य सरकारला पर्यावरणवादी व विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. मात्र, याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या कंपनीतून कोणतेच उत्पादन होत नाही. तसेच त्याची चाचणी घेण्यात येत आहे. प्रदुषण मंडळाचा अंतिम अहवाल आल्यावर या कंपनीला परवानगी दिली जाईल किंवा नाही हे नंतर ठरणार आहे. तसेच या कंपनीत माझी कोणतीच भागिदारी नसून अशा कंपन्यां मध्ये भागिदारी करण्यासाठी मी ‘चिंधी चोर’ नाही असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
इटली मधून हद्दपार करण्यात आलेली मिटेनी या विनाशकारी कंपनीची यंत्रणा रत्नागिरी येथील लोटे औद्योगिक वसाहतीत आलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत ३०० कंटेनर भरुन आणण्यात आल्याचे वृत सोशल मीडियावरून पसरवले. या बाबत वस्तुस्थित जरी खरी असली तरी राज्याच्या उद्योग विभागाने हात झटकायला सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, सोशल मीडियावर दिली जाणारी माहिती अपुरी व दिशाभूल करणारी आहे. अशा रसायन कंपन्यांमध्ये भागीदार होण्याइतका मी ‘चिंधीचोर नाही, नसल्याचे सांगितले.
चिपळुण येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत बोलताना म्हणाले, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत वस्तुस्थिती जाणून न घेता सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहे. सातवीत शिकणारा मुलगाही ऐकलेल्या माहितीमध्ये पुढे पाठवत आहे. काहींनी तर माझी या कंपनीत भागीदारी असल्याचा दावा करुन मला टार्गेट केले जात आहे. लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने अद्याप व्यावसायिक उत्पादन सुरू केलेले नाही. या कंपनीत केवळ चाचण्या सुरू झाल्या आहेत, याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला दिली आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल,असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – ‘पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कंपनीत तयार होणारे पीएफएएस हे रसायन इटलीमध्ये प्रतिबंधित असले, तरी भारतात ‘उदयोन्मुख प्रदूषक’ या वर्गवारीत काही अटींवर परवानगी दिली जाते. देशातील इतर ठिकाणीही याआधी अशा उत्पादनांना मंजुरी देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. याच आधारे केंद्रीय प्रदूषण
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने आजतागायत एकही टक्का उत्पादन केलेले नाही. केवळ चाचण्यांमधून निर्माण झालेला टाकाऊ माल तळोजा येथे जाळण्यासाठी पाठवण्यात आला आहे,असे ही सामंत यांनी सांगितले. ४ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिली असून, चाचण्यांचा अहवाल सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतर तज्ज्ञांकडून त्याचा अभ्यास केला जाणार आहे. हा अहवाल सकारात्मक असला तरीही हे उत्पादन प्रदूषणकारी आहे, कोकणच्या निसर्गाला धोका पोहोचू शकतो, असा निष्कर्ष निघाला, तर शासन म्हणून आम्ही या उत्पादनावर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.





