ताज्या घडामोडीराजकारण

दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आणि नव्या सरकारच्या शपथविधी कधी याची तारीख लवकर जाहीर

अमित शहा आणि जेपी नड्डा पंतप्रधान मोदींसोबतच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची घोषणा

दिल्ली : गेल्या आठवड्यात परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि त्यानंतर अमेरिकेच्या दौऱ्यावरून अखेर भारतात परतले आहेत. त्यांच्या वापसीनंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या अटकळींना लवकरच पूर्णविराम लागणार आहे. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आणि नव्या सरकारच्या शपथविधी कधी याची तारीख लौकरच जाहीर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे.

त्याअंतर्गत प्रथम 48 विजयी आमदारांपैकी 15 नावे निवडण्यात आली आणि त्यानंतर 9 नावे जातीय समीकरणाच्या आधारे निश्चित करण्यात आली. या 9 पैकी मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित होणार आहेत. म्हणजे निवडून आलेल्या आमदारांपैकीच कोणी एक मुख्यमंत्री होईल, हे स्पष्ट आहे.

पंतप्रधानांसोबत लवकरच बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे प्रमुख नेते यांची लवकरच बैठक होणार आहे. आज किंवा उद्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून त्यावर विचारमंथन झाल्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार आहे. त्यानुसार, 17 किंवा 18 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते आणि 19 किंवा 20 फेब्रुवारीला शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात राजधानी दिल्लीत नवे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शिवसृष्टीच्या दुसर्‍या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, ज्यामध्ये एनडीएच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे समजते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर गेल्या आठवड्यात ( 8 फेब्रुवारी) मतमोजणी होऊन निकाल लागला. या निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्या असून त्यांनी दिल्लीतील सत्ता गमावली आहे.

या विजयामुळे भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबाबत लवकरच चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या प्रवेश वर्मा यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button