पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर!… अल्पपरिचय वाचून थक्क व्हाल!
दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू भाऊसाहेब भोईर पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षासाठी अनुभवी नेतृत्व
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अनुभवी नगरसेवक भाऊसाहेब सोपानराव भोईर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले भोईर यांनी शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
भाऊसाहेब भोईर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष असून २९ वर्षांपासून बिनविरोध कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय सांस्कृतिक संमेलनांचे यशस्वी आयोजन केले असून बालनाट्य, लोककला आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने राबवले आहेत.
राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची ही नेमणूक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि नेतृत्व देणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाऊसाहेब सोपानराव भोईर यांचा अल्पपरिचय
शिक्षण :- बी-कॉम, नगरसेवक :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका (आत्तापर्यंत ६ वेळा निवड)
उपाध्यक्ष :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई
अध्यक्ष :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा.
शाळा महाविद्यालयातील भूषविलेली पदे :-
१) इयत्ता पाचवी पासून वर्ग प्रतिनिधी
२) इयत्ता आठवी शाळेचा सांस्कृतिक मंत्री
३) इयत्ता नववी शाळेचा पंतप्रधान.
सन १९८८ :- एन.एस.यु.आय. कॉलेज अध्यक्ष
सन १९८८ :- विद्यापीठात विरोधी वातावरणात सिनेट मेम्बर म्हणून निवड.
सन १९८९ :- एन.एस.यु.आय. शहर / जिल्हा अध्यक्ष
सन १९९२ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवड.
सन १९९४ :- पिंपरी चिंचवड शहर / जिल्हा युवक कॉंग्रेस (आय) अध्यक्ष पदी नियुक्ती.
सन १९९६ :- पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना.
मा. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते उदघाटन. आजतागायत गेली २९ वर्षे बिनविरोध अध्यक्ष
सन २००१ :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सदस्य म्हणून नियुक्ती
सन २००२ :- नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दुसऱ्यांदा निवड
सन २००७ :- नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर तिसऱ्यांदा निवड
सन २००७ :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा / कॉग्रेस (आय) अध्यक्षपदी निवड
सन २००९ :- कॉग्रेस (आय) पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली
सन २०१० :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विरोधी पक्षनेते पदी निवड
सन २०१० :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा / कॉग्रेस (आय) अध्यक्षपदी फेरनिवड
सन २०१२ :- नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर चौथ्यांदा निवड
सन २०१३ :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई येथे नियामक मंडळ सदस्य पदी पुणे विभागातून बहुमताने निवड व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना नियामक मंडळावर सहकार्यवाह म्हणून निवड.
सन २०१५ :- श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालकपदी बहुमताने निवड
सन २०१५ : पिं. चिं. मनपा. विधी समिती सदस्य पदी निवड
सन २०१६ :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
सन २०१७ :- नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पाचव्यांदा निवड
सन २०१८ :- वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य पदी निवड
सन २०२० :- पिं. चिं. मनपा शिक्षण समिती सदस्य पदी निवड
सन २०१८ :- नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक २०१८ मध्ये पुणे विभागातून बिनविरोध फेरनिवड. मध्यवर्ती संघटनेवर उपाध्यक्षपदी (उपक्रम) बिनविरोध निवड.
सन २०१८ :- ३ रे अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे यशस्वी आयोजन केले.
सन २०२३ :- पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी नियुक्ती.
सन २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक पदी सहाव्यांदा निवड.
सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कारकीर्द
दि. ८ ऑगस्ट १९९६ रोजी पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना केली आणि तेव्हापासून सलग २९ वर्षे पिंपरी चिंचवड शाखेचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्यरत. नाट्य परिषदेच्या माध्यमातून शहरात जागतिक दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
१. ऐतिहासिक संमेलनांचे यशस्वी आयोजनः
७९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (१९९९): शाखेच्या स्थापनेनंतर केवळ तीन वर्षांत या महासंमेलनाचे यशस्वी आयोजन केले.
इतरः २ रे अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन (२००९) आणि नवयुग साहित्य मंडळाचे रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन.
३ रे अखिल भारतीय लोककला संमेलन (२०१८): वारकरी दिंडी, गोंधळ, लेझीम आणि बान्या नृत्यासारख्या लोप पावत चाललेल्या लोककलांना भव्य व्यासपीठ मिळवून दिले.
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (२०२४): पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील ‘न भूतो न भविष्यती’ असा हा शतकमहोत्सवी सोहळा उत्कृष्ट संपन्न झाला. २ दिवसांत ६४ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा अविस्मरणीय आविष्कार शहरवासीयांनी अनुभवला.
२. संस्थात्मक आणि मध्यवर्ती पदभारः
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेत (मुंबई) उपाध्यक्ष (सन २०१६ व २०२३), सहकार्यवाह आणि नियामक मंडळ सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येत महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीचे नेतृत्व केले आहे.
३. कलावंत घडवणारे उपक्रम व स्पर्धाः
गडकरी करंडकः गेली २७ वर्षे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन.
बालनाट्य व कार्यशाळा: गेली २०-२५ वर्षे ‘कै. राजा गोसावी बालनाट्य स्पर्धा’, बालनाट्य शिबिरे आणि दिग्गज कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मुलांसाठी नाट्य कार्यशाळांचे आयोजन.
पिंपरी-चिंचवड आयडॉलः २०१४ पासून स्थानिक गायक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मोरया करंडक’ स्पर्धेची निर्मिती. दरवर्षी आयोजन, व त्यातून नवीन कलाकारांना संधी.
मोफत तालीम केंद्रः शहरातील कलावंतांना नाटक बसवण्यासाठी व त्यांच्या कला सादर करण्यासाठी गेली २५ वर्षे तालीम हॉल मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.
५. चित्रपट व नाट्य सृष्टीतील योगदानः
चित्रपट निर्माताः ‘मोकळा श्वास’ (स्त्री भ्रूणहत्या विषयावर), ‘हु-तू-तू’, ‘खेळ सात बाराचा’ आणि ‘थापाड्या’. ई चित्रपटांची निर्मिती.
अभिनेताः ‘सूर्योदय-एक नवी पहाट’, ‘खेळ सात बाराचा’ इ. चित्रपटांतून अभिनय.
नाट्य निर्मितीः मोरया थिएटर्स या संस्थेद्वारे ‘हसता हा सवता’ ‘छत्रपतींचे शिवतांडव’, ‘छबू वेडस बाबू’, ‘थैंक्स डियर’, ‘तुझे आहे तुजपाशी’ यांसह अनेक नाटकांची निर्मिती
६. विशेष उपक्रमः
मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘गौरव सोहळा’ आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन. यावेळी मा. पवार साहेबांच्या समवेत काम केलेल्या महान व्यक्तीमत्वांचा सत्कार करण्यात आला.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त सलग २४ तास ‘स्वरयज्ञ’ कार्यक्रमाचे आयोजन (२०२२).
अभिजात मराठी साप्ताह:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन. ७ दिवस अभिजात उपक्रमांचे आयोजन.
समाज सेवेसाठी मिळालेले पुरस्कार
१) महाराष्ट्र साहित्य परिषदेचा युवा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
२) पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार
३) नाट्य कला अकादमीचा नाट्यवैभव पुरस्कार
४) गदिमा रंगयात्री पुरस्कार
५) ब्लड असोसिएशनचा जीवन मित्र पुरस्कार
६) बंधुता परिषदेचा बंधुता पुरस्कार
७) विश्व विवेक फाउंडेशन चा विश्व विवेक पुरस्कार
८) दलित मित्र पुरस्कार
९) सांस्कृतिक भूषण पुरस्कार
१०) नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचा कार्य गौरव पुरस्कार
११) पंजाबी कला केंद्राचा कार्य गौरव पुरस्कार
१२) राजीव गांधी मंच महाराष्ट्र राज्याचा राजीव गांधी पुरस्कार
१३) कविवर्य नारायण सुर्वे कला अकादमीचा “जीवनगौरव” पुरस्कार
१४) महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांचा सांकृतिक स्नेहबंध पुरस्कार
१५) महाराष्ट्र व्यापारी संघटनेचा ‘शिवश्री’ पुरस्कार
१६) मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे कृतज्ञता पुरस्कार




