ताज्या घडामोडी

मतदान जनजागृती अभियानात साडेचार लाखाहून अधिक मतदारांचा सहभाग; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ७८ हजार २८८ इतक्या मतदारांनी सहभाग घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

बारामती तालुक्यात ४० हजार, मावळ ६९ हजार ७९०, मुळशी ४३ हजार ८३५, शिरुर ७० हजार ३५६, हवेली ३३ हजार ५६८, दौंड ३४ हजार ४१९, इंदापूर २ हजार ९९८, पुरंदर १ हजार ६२७, भोर ६ हजार ८५६, वेल्हे २५ हजार २९६, आंबेगाव ६० हजार २२३, जुन्नर ८१ हजार ५०० आणि खेड तालुक्यात ७ हजार ८२० असे एकूण ४ लाख ७८ हजार २८८ मतदारांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा    :              शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल, प्रकल्पाच्या खर्चात 15 हजार कोटींचा खर्च वाढला 

मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट १ हजार ७७५, पदयात्रा- ६६ हजार ६३१, कलापथक, पथनाट्य ८ हजार ९५७, सायकल यात्रा१५ हजार ४३१, मानवी साखळी १४ हजार ९०३, मतदारांना शपथ १ लाख २६ हजार ७७०, गृहभेटी ४१ हजार ३१५, महिलांकरिता मतदान जागृती विशेष कार्यक्रम ३२ हजार ३६८, स्टेटस दिवस, सेल्फी दिवस, समाज माध्यमांचा वापर ७ हजार १६८, प्रभातफेरी, मतदार जागृती फेरी ८० हजार ८३९, चित्रकला स्पर्धा २३ हजार ६८०, रांगोळी २० हजार २३९, इतर (संकल्पपत्र) ३८ हजार २१२ असे एकूण १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button