Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मावळमध्ये पुन्हा एकदा लागले अजित पवारांचे भावी मुख्यमंत्रीचे बॅनर

पुणे : राज्याचे राजकारण सद्या अजित पवार यांच्या भोवती फिरताना पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी बॅनर लागले आहेत. अनेक कार्यकर्ते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी बॅनर लावत आहे. त्यातच आता मावळ तालुक्यात देखील भावी मुख्यमंत्री अजित पवार या आशयाचे बॅनर लागले आहेत. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अजित पवारांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकेनात त्यांनी पुन्हा भावी मुख्यमंत्री असल्याचा बॅनर लावला आहे.

भावी मुख्यमंत्री अजित पवार या बॅनरवरून राजकीय वातावरण तापले होते. त्यावर अजित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर सांगितले होते की, कुणीही बॅनर लावून मुख्यमंत्री होत नाही. तसेच या संदर्भात सासुरवाडीत देखील त्यांनी सांगितले होते मात्र आता पुन्हा बॅनर लागल्याने अजित पवारांचे दादा ऐकेनात का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button