‘कौटुंबिक भेटीगाठी, कुठेही मॅच फिक्सिंग नाही’; अजितदादाचं विधान चर्चेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच, शरद पवारांसोबतच्या बैठकीबीबतही स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीच फसवणार नाही, असं ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले, लोकसभेच्या निडणुका तोंडावर आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. इंडिया आघाडी भाजपसमोर तग धरु शकणार नाही. लोक मोदींना मतं देणार की खर्गेंना? तुम्हीच सांगा? असं म्हणत अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत ठाम असल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा – Dunki : शाहरुखच्या ‘डंकी’ ची कमाई कमी, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटतं हे एकच आहेत. परंतु तसं काही नाहीये. आता नवीन भूमिका घेतलेली असून त्यात बदल होणार नाही. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, आमच्यात कुठेच मॅच फिक्सिंग नाहीये, असं अजित पवार म्हणाले.





