Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Dunki : शाहरुखच्या ‘डंकी’ ची कमाई कमी, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Dunki Box Office Collection : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरूखच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनची संख्या पाहता यंदा शाहरूखची जादू फिकी पडणार असं दिसत आहे. या वर्षातील शाहरुखचे पठाण व जवान सिनेमाने जोरदार सुरूवात केली होती. मात्र, डंकी कुठेतरी कमी पडणार असल्याचं दिसत आहे.

शाहरूखच्या डंकीने पहिल्या दिवशी फारच कमी कामई केल्याचं स्पष्ट दिसत आहे. अडवांस बुकिंगमध्ये डंकीने जवळपास १५ कोटींची कमाई केली होती. तर पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. शाहरूखच्या जवानने पहिल्या दिवशी ७४.५० कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा  –  २०२४ च्या निवडणुकांनंतर सरकार घटना बदलणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.. 

राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट परदेशात अवैधरित्या जाणाऱ्या लोकांच्या संघर्षावर बेतलेला आहे. या चित्रपटात शाहरूखसह तापसी पन्नू, विकी कौशल, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर, बोमन इराणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button