breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे घोषणाबाजी प्रकरणात पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना घेतले ताब्यात

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पोलिसांनी कोंढवा परिसरातून पीएफआयच्य 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. देशविरोधी घोषणाबाजी आणि एनआयएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवार संध्याकाळपासून पुणे पोलिसांनी ही कारवाई सुरु केली होती. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या 2 आणि पीएफआयच्या 4 जणांवर कारवाई केली.

अब्दुल बंसल (माजी SDPI अध्यक्ष), अयनुल मोमीन (PFI), काशीफ शेख (PFI सदस्य), दिलावर सैय्यद (SDPI), माज शेख, (PFI) मोहम्मद कैस (PFI) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. दरम्यान पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले होते. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रस्ता अडवणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, हिंसाचाराचा प्रयत्न आदींबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमके काय घडले –
दोन दिवसांपूर्वी एनआयएने कारवाई केली होती. त्यात पुण्यातील 2 पीएफआयच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. रझी अहमद खान आणि कयूम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पीएफआय संघटनेने पोलिसांनी परवानगी नसताना आंदोलन केले आणि या आंदोलनात पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजीचा वाद राज्यभार पेटला होता. अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button