TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

“धार्मिक रितीरिवाज पाळले नाही म्हणून मुंबईत पत्नीची हत्या”; पतीला अटक

मुलाला भेटू न देणाऱ्या पत्नीची चेंबूर परिसरात सोमवारी रात्री भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जारा शेख (२०) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून इकबाल शेख (३६) शेख असे आरोपी पतीचे नाव आहे.

मुलाचा ताबा मिळावा म्हणून पतीकडून पत्नीवर जबरदस्ती

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावर वास्तव्यास असोल्या जारा शेख (२०) हिचा तीन वर्षांपूर्वी इकबाल शेख (३६) याच्याबरोबर विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून जारा आणि इकबालमध्ये खटके उडू लागले होते. उभयतांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे काही दिवस जारा महिला वसतिगृहात राहात होती. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा चेंबूर परिसरात वास्तव्यास आली होती. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मुलाचा ताबा मिळावा यासाठी इकबाल तिला धमकावत होता. यासाठी त्याने अनेक वेळा जाराला मारहाणही केली होती, असा आरोप जाराच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button