breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PMPML Update:  गायकवाडनगर- पुनावळे ते निगडी पीएमपी बस सुविधा; प्रवाशांमध्ये समाधान!

भाजपा मंडल उपाध्यक्ष राहुल काटे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी : पुनावळे आणि परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार गायकवाडनगर पुनावळे ते निगडीपर्यंत पीएमपी बस सुविधा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भागात गेल्या १० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आयटी आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी, नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे सार्वजनिक प्रवास सुविधा सुरू करावी, अशी मागणी होत होती. 

त्यानुसार, भाजपा मंडल उपाध्यक्ष राहुल काटे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले. पीएमपी बस क्रमांक-363 ची सुरूवात उत्साहात करण्यात आली. 

यावेळी भाजपा मंडल उपाध्यक्ष राहुल काटे, युवा नेते नवनाथ ढवळे, कामगार नेते सुरेश रानवडे व पुनावळे परिसरातील नागरिक उपस्थित होते.

राहुल काटे म्हणाले की, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आणि आमदार अश्निनी जगताप तसेच भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपी बस सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या बसचा फायदा परिसरातील नागरीकांनी घ्यावा तसेच भविष्यात नवीन मार्गावंर सुविधा सुरू करण्याचा मानस आहे. सर्वसामान्य प्रवाशांना बस सुविधेचा लाभ होईल, अशा भावना राहुल काटे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सियोना ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणीला यश…

पीएमपी बस रुट क्रमांक ३६३ च्या सकाळी व दुपारी ३ फेऱ्या कोयतेवस्ती-पुनावळेपर्यंत करण्यासाठी सियोना ज्येष्ठ नागरिक संघाने प्रशासनाने सातत्याने मागणी केली आहे. पीएमपी बस अभावी स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने कार्यवाही करावी. यासाठी संघाचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्रकाश कोडुले, सचिव आनंद शेट्टी आणि सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णर्याचे स्वागत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button