breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘मी भारतमातेचा सर्वात मोठा पुजारी अन्..’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन झालं. या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. मी भारतमातेचा पुजारी आहे आणि १४० कोटी भारतीय माझे आराध्य आहेत. देशातला प्रत्येक नागरिक माझं आराध्य दैवत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझं सौभाग्य आहे की, अयोध्येतील राम मंदिरापाठोपाठ आज मी अबू धाबीतल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. माझे मित्र ब्रह्म स्वामी मघाशी म्हणत होते की, मोदी सर्वात मोठे पुजारी आहेत. परंतु मला माहिती नाही की, मंदिराचा पुजारी होण्याइतकी माझी पात्रता आहे का? परंतु मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, मी भारतमातेचा सर्वात मोठा पुजारी आहे. परमेश्वराने मला जितकं आयुष्य दिलंय. मला जे आणि जसं शरीर दिलं आहे त्याचा प्रत्येक कण मला केवळ भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित करायचा आहे. मी भारतमातेचा पुजारी आहे आणि १४० कोटी भारतीय माझे आराध्य आहेत. देशातला प्रत्येक नागरिक माझं आराध्य दैवत आहे.

हेही वाचा     –        ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत भारती विद्यापीठाचा स्मार्ट सिटी प्रकल्पांचा अभ्यास दौरा 

आपल्या वेदांमध्ये सांगण्यात आलं आहे की ‘एकम सत्यं विप्रा बहुदा वदंति’, याचा अर्थ असा आहे की, ईश्वर एकच आहे, एकच सत्य आहे, परंतु विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर मांडतात. हे तत्वज्ञान भारताच्या मूलभूत चेतनेचा एक भाग आहे. त्यामुळेच आपण सर्वाचं स्वागत करतो. आपल्याला विविधतेतही एकात्मताच दिसते आणि हीच आपली खासियत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं लोकार्पण पार पडलं. हे BAPS मंदिर दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलं आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या UAE भेटीदरम्यान तिथल्या सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मोदी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पवित्र वसंत पंचमीच्या दिवशी पार पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button