Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘निरोगी जीवनशैली साठी योगाला आत्मसात करावे’; शत्रुघ्न काटे

पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा महाउत्सव; शहरात ३१ ठिकाणी भाजपचे योग कार्यक्रम संपन्न

पिंपरी-चिंचवड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह आज पिंपरी-चिंचवड शहरात ओसंडून वाहत होता. भारतीय जनता पार्टीने या दिनानिमित्त शहरात १४ मंडलनिहाय एकूण ३१ ठिकाणी भव्य योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो योग साधक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक परिसरातील शिव छत्रपती लिनियर अर्बन गार्डन येथे झालेल्या योग शिबिराला विशेष प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पार्टी, रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग, संघ परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे सत्यजित भैया यांनी संगीताच्या तालावर उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायाम करून घेतले. त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल सविस्तर माहिती देत, नागरिकांना योगाभ्यासाविषयी जागरूक केले.

प्रसंगी, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग आपल्याला केवळ शारीरिक तंदुरुस्तीच देत नाही, तर तो मानसिक शांती आणि एकाग्रताही प्रदान करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर नेऊन संपूर्ण मानवजातीला एक अनमोल भेट दिली आहे.”

काटे पुढे म्हणाले की, “योग हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियमित योगाभ्यासाने ताणतणाव कमी होतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. यामुळे व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठीही अधिक कार्यक्षम बनते. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले.

या प्रमुख कार्यक्रमाला जयनाथ काटे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अमित मगर,कुंदाताई भिसे,वसंत काटे,विजय भिसे,अरुण चाबुकस्वार,अनिताताई काटे,संदीप काटे,भरत काटे,संजय भिसे, संदेश काटे,मनोज ब्राह्मणकर,मनीष श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, संघ भास्कर शाखा आणि ज्योतिबा शाखेचे स्वयंसेवक,परिसरातील ज्येष्ठ नागरिक गट आणि तरुण वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.

हेही वाचा –  कुदळवाडीतील नागरिकांनी घेतला योग साधनेचा अनुभव

शहरात आयोजित ३१ योग कार्यक्रमांची ठिकाणे:

समीर लॉन्स, रावेत, काशिधाम मंगल कार्यालय, पवना नगर चिंचवड, शुभम गार्डन मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे लॉन्स- चिंचवड गाव, ज्योतिबा मंगल कार्यालय काळेवाडी, राम वाकडकर यांचे संपर्क मॅच डेल अरेना टर्फ मैदान वाकड, धर्मवीर संभाजी गार्डन, रहाटणी, स्वर्गीय तानाजीराव शितोळे उद्यान, सांगवी, रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव, कारवार समाज हॉल, नवी सांगवी, नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांचे संपर्क कार्यालय, श्रीधरनगर, दुर्गादेवी टेकडी उद्यान, निगडी, शंकर शेट्टी उद्यान, काळभोर नगर, पिरॅमीड हॉल, शाहू नगर चिंचवड, शिव पार्वती सभा मंडप, मोहन नगर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, म्हाडा मोरवाडी, संत तुकाराम महाराज मंदिर, सं.तु.नगर पिंपरी, कासारवाडी सांस्कृतिक भवन, कासारवाडी, गाथा हॉल, वाळूंजकर मिनी मार्केट, दापोडी, शंकर मंदिर, पिंपरी गाव, अटलबिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णा नगर, तळई गार्डन, जाधव वाडी, ठाकरे क्रीडा संकुल, यमुनानगर निगडी, पांडुरंग बँक्वेट हॉल, चऱ्होली, चक्रपाणी वसाहत, भोसरी, सद्गुरू नगर, भोसरी, सेक्टर १२, इंद्रायणी नगर, क्वालिटी सर्कल, इंद्रायणी नगर, सेक्टर ३, इंद्रायणी नगर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक नगरसेवक, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्ट प्रमुख यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम घेण्यात आले.

संपूर्ण शहरात या ३१ कार्यक्रमांमुळे योगाचे महत्त्व घराघरात पोहोचले. नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून योगाला आत्मसात करावे, या उद्देशाने भाजपने हे व्यापक आयोजन केले होते. योग दिनाच्या या यशस्वी आयोजनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दलची जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे, असेही शत्रुघ्न (बापू) काटे यावेळी म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button