Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीतील नागरिकांनी घेतला योग साधनेचा अनुभव

जागतिक योग दिन: माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार

पिंपरी चिंचवड: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने कुदळवाडी येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून योग साधनेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे महत्त्व सांगण्यात आले आणि नियमित योगाभ्यासामुळे होणारे मानसिक व शारीरिक फायदे समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.

हेही वाचा –  मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

या प्रसंगी दिनेश यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनायला हवा. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते.”

कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले असून, स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button