पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच! SNDT महिला विद्यापीठ अंतर्गत B. Sc. IT अभ्यासक्रमाची सुविधा!
शिक्षण विश्व: शहरातील Vidya Valley North Point School चा पुढाकार

पिंपरी-चिंचवड : शहरातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत Vidya Valley North Point School ने SNDT महिला विद्यापीठाच्या अधिपत्याखाली B.Sc. IT (बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम प्रथमच सुरू केला आहे. हे शिक्षण पिंपरी-चिंचवडमधील महिला विद्यार्थिनींसाठी आयटी क्षेत्रात करीयर करण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे.
हा अभ्यासक्रम केवळ अकादमिक ज्ञानापुरता मर्यादित नसून, तो विद्यार्थ्यांना नेटवर्किंग, सायबरसुरक्षा, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग, आणि आयटी कन्सल्टिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सक्षम करतो. अभ्यासक्रमाला उद्योग-केंद्रित रचना, अनुभवी प्राध्यापक, प्रत्यक्ष अनुभव (hands-on training), तसेच “कमवा आणि शिका” यासारख्या संधींचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘निरोगी जीवनशैली साठी योगाला आत्मसात करावे’; शत्रुघ्न काटे
Vidya Valley North Point संस्थेचा विशेष भर महिला-केंद्रित आणि सुरक्षित शिक्षण वातावरणावर आहे. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे समर्पित Placement Cell त्यांना industry-ready बनवण्याचे काम करत आहे.
B.Sc. IT नंतर करिअर संधी :
नेटवर्किंग स्पेशालिस्ट, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, डेटा ॲनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर, IT कन्सल्टंट, आणि अनेक अन्य आधुनिक क्षेत्रांमध्ये करिअरची दारे खुली होतात. तसेच, उच्च शिक्षणाच्या संधी सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना IT, MCA, किंवा M.Sc. सारख्या उच्च पदवी अभ्यासक्रमांसोबत क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्ससारख्या विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थिनींना शासकीय शिष्यवृत्तीचेही लाभ मिळणार आहेत.प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क –📞 ९४२२५ ३७६२३ / ९४२२५ ३७६२६ आजच नावनोंदणी करून तुमच्या आयटी करिअरला गती द्या, असे आवाहन केले आहे.




