ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वराज चौक-जैनमंदिर 18 मीटर रस्त्याच्या कामाला ‘‘गती’’

भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार : नवनिर्वाचित नगरसेविका अनिता काटे, कुंदा भिसे यांचा पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपळे सौदागर – स्वराज चौक येथील जैन मंदिर रोड समोरील १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे विकासकाम अखेर सुरू झाले आहे. या कामास गती देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.

रस्ता विकासकाम अनेक दिवस प्रलंबित होते, पण शत्रुघ्न काटे यांनी नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि सौ. कुंदाताई भिसे यांच्यासह संबंधित जागामालकांशी सकारात्मक चर्चा करून अडचणी दूर केल्या. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू होऊ शकले.

काल झालेल्या मॅरेथॉन आढावा बैठकीदरम्यान शत्रुघ्न काटे यांनी प्रत्यक्ष रस्त्याचे निरीक्षण करून अडचणींचा आढावा घेतला आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

या रस्त्याच्या विकासामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार असून स्थानिक रहिवासी व वाहनचालकांची दीर्घकालीन गैरसोय दूर होणार आहे. काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मार्फत नियोजित व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.

“स्वराज चौक-जैन मंदिर रस्ता प्रलंबित होता, परंतु आता हा रस्ता विकासकाम सुरळीतपणे सुरू झाले आहे. आमचा उद्देश स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांसाठी दीर्घकालीन गैरसोय दूर करणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेला सुधारणा घडवून आणणे हा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत योग्य समन्वय साधत, हा रस्ता नियोजित व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईल, याची आम्ही हमी देतो.”
— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button