Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

1970 नंतर पहिल्यांदाच घुमानमध्ये घुमला कीर्तनाचा आवाज!

शिक्षण विश्व: घुमान- पंजाब येथे संतपीठाचा अभ्यास दौरा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ यांच्या वतीने पंजाब घुमान येथे एक विशेष अभ्यास दौरा आयोजित केला गेला.

या अभ्यास दौऱ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उपायुक्त व संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप खोत, शिक्षणाधिकारी व संतपीठाच्या सेक्रेटरी सौ संगीता बांगर, संतपीठच्या संचालिका डॉ. सौ स्वाती मुळे, संचालक ह. भ. प. श्री राजु महाराज ढोरे, तसेच प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्या सह भाषा, समाजशास्त्र, संगीत आणि कला विषयाचे शिक्षक सहभागी झाले.

अभ्यास दौऱ्यादरम्यान सहभागी शिक्षकांनी घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शैक्षणिक व्यवस्थेचा अभ्यास केला.

हेही वाचा      :            ‘काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल’; शाहबाज शरीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य 

संध्याकाळी घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिर मध्ये संतपीठाचे संचालक ह. भ. प. श्री राजु महाराज ढोरे यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अभंगावर “तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा” कीर्तन केले. या अभंगाच्या माध्यमातून विविध सांप्रदायिक दृष्टांत स्पष्ट केले गेले आणि प्रत्येक चरणाचा अर्थ समजावून सांगितला.

संतशिरोमनी नामदेव महाराजांचे स्मरण…

यावेळी महाराष्ट्रातील वारकरी परंपरेनुसार पहिल्यांदाच हिंदी कीर्तन सेवा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात पार पडली. यापूर्वी 1970 साली फक्त मंदिरासमोरच सप्ताह केला गेला होता. कीर्तन सेवेसाठी पखावज व संगीत अलंकार महेश शेळके व अविनाश भोगील यांनी केले, हार्मोनियम वादनासाठी संगीत विशारद चंद्रकांत गोसावी उपस्थित होते, तर गायन साथ संगीत अलंकार श्री विलास कोकाटे यांनी केला. कीर्तन सेवेत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उपायुक्त श्री संदीप खोत, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. संतपीठाच्या माध्यमातून या प्रकारच्या अभ्यास दौऱ्यांनी शिक्षकांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या अमूल्य अनुभव मिळवून दिला असून भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमित करण्याची योजना आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button