पिंपरी / चिंचवड

आम्ही इथले भाई आहोत, आमच्याशी नडायची कोणाची ताकद आहे का ?

पिंपळे निलख येथे किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

चार जणांनी मिळून एका तरुणाला खुन्नस देतो का, असे म्हणत मारहाण केली. दुस-या तरुणालाही मारहाण केली. जमलेल्या लोकांना पाहून ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्याशी नडायची कोणाची ताकद आहे का ?’ अशी धमकी देत दहशत पसरवली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजता पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

कुणाल संभाजी सातकर (वय 22), प्रसाद पांडुरंग पवार (वय 21), संकेत रांजेंद्र मुरकुटे (वय 20), जीवन रमेश लोंढे (वय 18, सर्व रा. पिंपळे निलख) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोहम राहुल शिंदे (वय 19, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना खुन्नस देतोस का, असे म्हणून खाली पाडून छातीवर बसून हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी प्रसाद याने सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. आरोपी जीवन याने फिर्यादीच्या खिशातून 10 हजरांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून पळून गेला. फिर्यादी यांचा मित्र वैभव संजय ढोरे याला देखील आरोपींनी हाताने मारहाण केली. तिथे जमलेल्या लोकांकडे पाहून ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्याशी नडायची कोणाची ताकद आहे का ?’ असे मोठमोठ्याने बोलून दहशत पसरवली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button