पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक २१: घोषणांनी दणाणलेला परिसर देतोय ''घडयाळयाच्या विजयाची'' खात्री

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीस नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निकिता अर्जुन कदम, संदीप बाळकृष्ण वाघेरे, प्रियंका सुनील कुदळे आणि हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांच्या प्रचारार्थ ही बाईक रॅली काढण्यात आली होती. प्रभागातील विविध भागांतून ही रॅली मार्गक्रमण करत असताना युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

हेही वाचा –  मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

हातात पक्षाचे झेंडे, घोषणांनी दणाणलेला परिसर आणि उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले होते. विकास, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

या बाईक रॅलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि उमेदवारांबद्दलची जनतेची सकारात्मक भावना स्पष्टपणे दिसून आली. नागरिकांनी रॅलीदरम्यान उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करून आपला पाठिंबा दर्शविला. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button