Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; उच्चभ्रू सोसायटीत कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड

महापालिकेने बजावली नोटीस

पिंपरी : बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट या उच्चभ्रू सोसायटीत कोट्यावधीचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. कराडने थकबाकी न भरल्यास पिंपरी चिंचवड महापालिका पुढे नेमकी काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा     –      धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजित पवार स्पष्टच बोलले.. 

दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराड याच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button