‘वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’ संदर्भात वीज वितरण आढावा बैठक झाली.
यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, टाटा पॉवर, अदाणी पॉवरचे व ‘बेस्ट’चे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
हेही वाचा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते कराड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन
आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज
रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली.
कोयना जलविद्युत प्रकल्प: गरजेनुसार १८०० मेगावॅट पर्यंत पूर्ण क्षमतेने वापर
-आपत्कालीन परिस्थितीत: आवश्यकतेनुसार अतिरिक्त वीज खरेदी
-एमएमआरमधील प्रसारण प्रणालीचे मजबूतीकरण
पुरेशा वीज खरेदीची व्यवस्था
-मुंबई आयलँडिंग योजना कार्यरत ही एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा असून, ग्रीडमध्ये बिघाड झाल्यास मुंबईला स्वतंत्रपणे चालवण्याची क्षमता.
-मोठ्या प्रमाणातील वीज खंडित होण्यापासून संरक्षण
-भिरा पंप्ड स्टोरेज प्रकल्प कार्यरत
-सर्व ब्लॅक स्टार्ट ड्रिल्स यशस्वीरीत्या पूर्ण
-राज्य लोड डिस्पॅच केंद्र (SLDC) च्या बॅकअप कंट्रोल ड्रिल पूर्ण ज्यामुळे मुख्य नियंत्रण केंद्रात अडचण आल्यास कामकाज सुरळीत चालू राहू शकते.





